चरित्र
चरित्र
डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून १९५२) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहाससंशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संतसाहित्याचे, विशेषतः संत तुकारामांच्या साहित्याचे ते अभ्यासक आहेत. त्यांनी तत्त्वज्ञान आणि प्राचीन भारतीय संस्कृती व इतिहास या दोन विषयांत एम.ए. केले. 'द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन' या विषयावरील त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाला गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला. पेशाने ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाशी संबंधित होते.
समुदायाने जोडले
बंद