चरित्र
चरित्र
सई परांजपे (जन्म : १९ मार्च १९३८) या मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्यलेखिका, पटकथाकार आणि चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या प्रकारात मोडणारे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे 'मुलांचा मेवा' हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. रँग्लर र. पु. परांजपे हे त्यांचे आजोबा आणि पद्मभूषण विजेत्या शकुंतला परांजपे या त्यांच्या आई. चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. 'स्पर्श' (१९८०) आणि 'चष्मेबद्दूर' (१९८१) हे त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. 'जास्वंदी' हे त्यांचे बालनाट्य आहे. बालसाहित्य, बालनाट्य, नाटक, पटकथा आणि चित्रपटनिर्मिती अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
समुदायाने जोडले
बंद