शि.द. फडणीस

चरित्र

चरित्र

शिवराम दत्तात्रेय फडणीस (जन्म : २९ जुलै १९२५, भोज, बेळगाव) हे मराठी व्यंगचित्रकार आहेत. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ वाचकांना हसवले. व्यंगचित्रे नेहमी बोचरी टीका करणारी असतात, हा समज खोटा ठरवत त्यांनी विसंगतीतून निर्विष आणि सुखावणारा विनोद निर्माण केला. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची आणि पुस्तकांची मुखपृष्ठे सजली. पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी यांसारख्या लेखकांच्या पुस्तकांची लज्जतही त्यांच्या चित्रांनी वाढवली.

समुदायाने जोडले
बंद