शिरीष कणेकर

इंग्रजी नाव
Shirish Kanekar

चरित्र

चरित्र

शिरीष मधुकर कणेकर (६ जून १९४३ – २५ जुलै २०२३) हे मराठी लेखक, पत्रकार आणि कथनकार होते. विनोदी लेखन आणि क्रीडा पत्रकारितेसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म पुणे येथे झाला; पेण हे त्यांचे मूळ गाव. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए., एलएल.बी. झाले. 'इंडियन एक्सप्रेस', 'फ्री प्रेस जर्नल' आदी इंग्रजी वृत्तपत्रांत त्यांनी काम केले. 'लोकसत्ता'मधील 'यादों की बारात', 'शिरीषासन' यांसह अनेक सदरे गाजली. 'कणेकरी' आणि 'माझी फिल्लमबाजी' हे त्यांचे एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय होते; क्रिकेट आणि चित्रपटसृष्टी हे त्यांचे आवडते विषय होते. 'क्रिकेट-वेध', 'यादोंकी बारात', 'फिल्लमबाजी', 'डॉलरच्या देशा' ही त्यांची पुस्तके आहेत.

समुदायाने जोडले
बंद