शिरीष पै

चरित्र

चरित्र

शिरीष व्यंकटेश पै (१५ नोव्हेंबर १९२९ – २ सप्टेंबर २०१७, मुंबई) या मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार होत्या. आचार्य अत्रे हे त्यांचे वडील होते. कथा, कविता, नाटक आणि ललित लेखन अशा सर्व प्रकारांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी 'नवयुग' साप्ताहिकाचे (१९५६–१९६०) आणि दैनिक 'मराठा'चे (१९६९–१९७६) संपादन केले; एकूण २५ वर्षे त्या वृत्तपत्र व्यवसायात होत्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही त्यांनी प्रखर भूमिका घेतली.

समुदायाने जोडले
बंद