शिवाजी सावंत

इंग्रजी नाव
Shivaji Sawant

चरित्र

चरित्र

शिवाजी गोविंदराव सावंत (३१ ऑगस्ट १९४० – १८ सप्टेंबर २००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कोर्टात कारकून म्हणून नोकरी केली आणि १९६२ ते १९७४ या काळात कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत शिक्षक होते. कर्णाच्या जीवनावरील 'मृत्युंजय' (१९६७) ही कादंबरी मराठीत मानदंड मानली जाते; त्यामुळे ते 'मृत्युंजयकार' म्हणून ओळखले जातात. संभाजी महाराजांवरील 'छावा' (१९७९) आणि श्रीकृष्णावरील 'युगंधर' (२०००) या त्यांच्या इतर गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. 'मृत्युंजय'साठी त्यांना भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार (१९९४) मिळाला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

समुदायाने जोडले
बंद