चरित्र
चरित्र
सर अहमद सलमान रश्दी (जन्म : १९ जून १९४७) हे मूळ भारतीय असलेले, जागतिक कीर्तीचे ब्रिटिश-भारतीय कादंबरीकार आणि निबंधलेखक आहेत. 'मिडनाइट्स चिल्ड्रन' या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीला १९८१ मध्ये बुकर पुरस्कार मिळाला. त्यांच्या कादंबऱ्यांत भारतीय उपखंडाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक कथानक आणि जादुई वास्तववाद यांचा मेळ दिसतो. पौर्वात्य आणि पाश्चात्य संस्कृतींमधील संबंध, संघर्ष आणि स्थलांतर हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय आहेत. १९८८ मधील त्यांची चौथी कादंबरी 'द सॅटॅनिक व्हर्सेस' मोठ्या वादाचा विषय ठरली आणि भारतात तिच्यावर बंदी घालण्यात आली.
समुदायाने जोडले
बंद