चरित्र
चरित्र
समर्थ रामदास (जन्मनाव नारायण सूर्याजी ठोसर; २४ मार्च १६०८, जांब – १३ जानेवारी १६८१, सज्जनगड) हे महाराष्ट्रातील संतकवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. राम आणि हनुमंत यांना उपास्य मानणाऱ्या रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात प्रबोधन व संघटनाचे कार्य केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण आणि धर्मकारण यांची सांगड जाणीवपूर्वक घालणारे संत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. पर्यावरणाविषयी प्रबोधन करणारे लेखनही त्यांनी केले आहे.
समुदायाने जोडले
बंद