शंकर पाटील

इंग्रजी नाव
Shankar Patil

चरित्र

चरित्र

शंकर पाटील (८ ऑगस्ट १९२६ – १८ ऑक्टोबर १९९४) हे मराठी कथाकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टण-कोडोली येथे झाला. त्यांचे शिक्षण गडहिंग्लज आणि कोल्हापूर येथे झाले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात त्यांनी मराठी विषयाचे विशेष अधिकारी म्हणून काम केले. 'वळीव' (१९५८), 'भेटीगाठी' (१९६०), 'आभाळ' (१९६१), 'धिंड' (१९६२), 'ऊन' (१९६३), 'खेळखंडोबा' (१९७४) ही त्यांची पुस्तके आणि 'टारफुला' ही कादंबरी प्रसिद्ध आहे. 'एक गाव बारा भानगडी', 'पिंजरा', 'युगे युगे मी वाट पाहिली' अशा चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. १९८५ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

समुदायाने जोडले
बंद