चरित्र
चरित्र
शंकर नारायण नवरे ऊर्फ शन्ना (२१ नोव्हेंबर १९२७ – २५ सप्टेंबर २०१३) हे मराठी लेखक, नाटककार आणि पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव आणि भावविश्व रेखाटणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात; त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत. जयवंत दळवी यांच्या 'महानंदा' कादंबरीवरून त्यांनी लिहिलेले 'गुंतता हृदय हे' हे नाटक अमाप गाजले. 'शन्नाडे' या नावाने त्यांनी वृत्तपत्रांत स्तंभलेखनही केले. २००३ मध्ये डोंबिवलीत झालेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
समुदायाने जोडले
बंद