संत तुकाराम

चरित्र

चरित्र

संत तुकाराम हे सतराव्या शतकातील वारकरी संतकवी होते; त्यांचा जन्म देहू येथे झाला. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचे आराध्यदैवत होते आणि वारकरी त्यांना 'जगद्गुरू' म्हणून ओळखतात. अभंगांच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांना ईश्वरभक्तीचा सुगम मार्ग दाखवला आणि समाजातील दांभिकपणावर रोखठोक प्रहार केले. त्यांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून ते आजही खेड्यापाड्यांत नित्यपाठात आहेत. अभंगांबरोबरच त्यांनी गवळणीही रचल्या.

समुदायाने जोडले
बंद