चरित्र
चरित्र
शोभा डे (मूळ नाव शोभा राजाध्यक्ष; जन्म : ७ जानेवारी १९४८) या भारतीय कादंबरीकार आणि स्तंभलेखिका आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात राजाध्यक्ष कुटुंबात झाला. मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. तरुण वयात मॉडेल म्हणून नाव कमावल्यानंतर १९७० मध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. 'पेज थ्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संपन्न भारतीयांच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचे चित्रण त्यांच्या लेखनात आढळते.
समुदायाने जोडले
बंद