चरित्र
डॉ. शरदिनी अरुण डहाणूकर (१७ ऑक्टोबर १९४५, मुंबई – ४ ऑगस्ट २००२) या क्लिनिकल फार्माकॉलॉजिस्ट, आयुर्वेद संशोधक आणि मराठी ललितलेखिका होत्या. सेठ गो. सु. वैद्यकीय महाविद्यालयातून १९६९ मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली. वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांच्याकडे त्यांनी आयुर्वेदाचे शिक्षण घेतले. १९८९ मध्ये के.ई.एम. रुग्णालयात त्यांनी आयुर्वेद संशोधन केंद्र स्थापन केले. नंतर त्या नायर रुग्णालय व टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठात्री झाल्या. 'वृक्षगान', 'फुलवा', 'सगे सांगाती', 'हिरवाई', 'मनस्विनीचे मणी', 'पांचाळीची थाळी' ही त्यांची मराठी ललित पुस्तके प्रसिद्ध आहेत. 'Ayurveda Unravelled', 'Ayurveda Revisited' आणि 'Heal by Herbs' ही त्यांची इंग्रजी पुस्तके आहेत. त्यांना डॉ. वसंत पै पुरस्कार, महिला गौरव पुरस्कार आणि वनिता समाज गौरव पुरस्कार मिळाले.