छायाचित्र
श्री. ना. पेंडसे

श्री. ना. पेंडसे

इंग्रजी नाव
Shri. Na. Pendse

चरित्र

चरित्र

श्रीपाद नारायण पेंडसे (५ जानेवारी १९१३ – २३ मार्च २००७) हे मराठी कथालेखक आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी येथे झाला आणि १९२४ मध्ये ते मुंबईत स्थायिक झाले. बालपणी पाहिलेल्या कोकणावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मुंबईच्या बेस्ट उपक्रमात त्यांनी निवृत्तीपर्यंत नोकरी केली. 'एल्गार' (१९४९), 'हद्दपार' (१९५०) आणि 'गारंबीचा बापू' (१९५२) या कादंबऱ्यांमुळे ते प्रादेशिक कादंबरीकार म्हणून नावारूपाला आले. 'रथचक्र' (१९६२) या कादंबरीला १९६३ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८८ मध्ये 'तुंबाडचे खोत' ही त्यांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली. 'श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस' हे त्यांचे आत्मचरित्र आहे.