चरित्र
चरित्र
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (२९ जून १८७१ – १ जून १९३४) हे मराठीतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी आणि समीक्षक होते. 'बहु असोत सुंदर संपन्न की महा' या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म बुलढाणा येथे झाला आणि हायस्कूलमध्ये असतानाच त्यांनी 'सुखमालिका' हे नाटक लिहिले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी आणि मराठी साहित्याचे, विशेषतः विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या 'निबंधमाले'चे विपुल वाचन केले. १८९७ मध्ये कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अकोला आणि जळगाव जामोद येथे वकिली केली.
समुदायाने जोडले
बंद