चरित्र
चरित्र
श्रीपाद नारायण पेंडसे (५ जानेवारी १९१३ – २३ मार्च २००७) हे मराठी कथालेखक आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला आणि १९२४ मध्ये ते मुंबईत कायमचे स्थायिक झाले. वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत पाहिलेला कोकण आयुष्यभर त्यांच्या लेखनाचा विषय राहिला. खासगीत त्यांना 'शिरूभाऊ' म्हणत आणि हेच नाव साहित्यवर्तुळातही रूढ झाले. 'श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस' हे त्यांचे आत्मचरित्र आहे; मुंबईच्या बेस्ट कंपनीत त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत नोकरी केली.
समुदायाने जोडले
बंद