शरणकुमार लिंबाळे

इंग्रजी नाव
Sharankumar Limbale

चरित्र

चरित्र

प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे (जन्म : १ जून १९५६) हे मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या लेखनाने दलित साहित्यात मोलाची भर घातली आहे. 'अक्करमाशी' या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' सारखी त्यांची पुस्तके साहित्याच्या अभ्यासकांकडून महत्त्वाची मानली जातात. त्यांनी सुमारे ४० पुस्तके लिहिली असून त्यांत 'उद्रेक', 'उपल्या', 'गावकुसाबाहेरील कथा', 'झुंड', 'दलित पँथर', 'दलित प्रेमकविता', 'दंगल', 'दलित ब्राह्मण', 'हिंदू', 'पुन्हा अक्करमाशी' आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र 'प्रज्ञासूर्य' यांचा समावेश आहे. २०११ मध्ये नांदेड येथे झालेल्या १२व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

समुदायाने जोडले
बंद