सरोजिनी बाबर

चरित्र

चरित्र

डॉ. सरोजिनी कृष्णराव बाबर (७ जानेवारी १९२० – २० एप्रिल २००८) या लोककला आणि लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणाऱ्या नामवंत मराठी लेखिका होत्या. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बागणी येथे झाला; 'मराठी साहित्यातील स्त्री लेखिकांचे योगदान' या विषयावरील प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. मिळाली. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दुर्मीळ लोकसाहित्याचे संकलन, संपादन आणि प्रकाशन केले. 'समाज-शिक्षण माला' हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्या महाराष्ट्र विधानसभा, विधानपरिषद आणि राज्यसभा (१९६८–१९७४) यांच्या सदस्या होत्या.

समुदायाने जोडले
बंद