चरित्र
चरित्र
सतीश वसंत आळेकर (जन्म : ३० जानेवारी १९४९, दिल्ली) हे मराठी नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले; फर्ग्युसन कॉलेजमधून बी.एस्सी. आणि १९७२ मध्ये पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. केले. शाळकरी वयात पाहिलेल्या 'शांतता! कोर्ट चालू आहे'च्या प्रयोगाने ते भारावून गेले. तेंडुलकरांच्या 'ओळख' आणि 'काळोख' या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला. भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये ते दाखल झाले आणि 'घाशीराम कोतवाल'चे सहदिग्दर्शन केले. 'मेमरी' ही त्यांची पहिली एकांकिका 'सत्यकथा'त प्रसिद्ध झाली. 'मिकी आणि मेमसाब', 'महापूर', 'महानिर्वाण' आणि 'बेगम बर्वे' ही त्यांची नाटके आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी सन्मान आणि २०१२ मध्ये पद्मश्री मिळाली.
समुदायाने जोडले
बंद