सुबोध जावडेकर

चरित्र

चरित्र

सुबोध प्रभाकर जावडेकर (जन्म : १९४८, इस्लामपूर) हे मराठी विज्ञानकथा लेखक आहेत. त्यांचे शिक्षण इस्लामपूर, गारगोटी आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. १९७१ मध्ये त्यांनी मुंबई आयआयटीमधून रसायन अभियांत्रिकीची पदवी घेतली. एसीसी, हिंदुस्तान लिव्हर आदी कंपन्यांमध्ये सदतीस वर्षे नोकरी करून २००८ मध्ये ते जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. १९८२ मध्ये लिहिलेल्या पहिल्या विज्ञानकथेला मराठी विज्ञान परिषदेच्या स्पर्धेत दुसरे बक्षीस मिळाले; त्यानंतर त्यांनी सुमारे शंभर विज्ञानकथा लिहिल्या. त्यांच्या कथा विज्ञानाच्या भक्कम पायावर उभ्या असूनही माणसांच्या कथा असतात. 'गुगली' या पहिल्या कथासंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. 'हसरं विज्ञान' आणि 'आकाशभाकिते' यांना राज्य पारितोषिके, 'मेंदूतला माणूस'ला सार्वजनिक वाचनालय नाशिकचा पुरस्कार आणि 'कुरुक्षेत्र'ला केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला.

समुदायाने जोडले
बंद