छायाचित्र
शुभदा चौकर

शुभदा चौकर

चरित्र

चरित्र

शुभदा चौकर या ‘वयम्’ या किशोरांच्या मासिकाच्या मुख्य संपादिका असून त्याआधी त्या २० वर्षं ‘लोकसत्ता’ या आघाडीच्या दैनिकात कार्यरत होत्या. सुमारे १० वर्षं त्यांनी लोकसत्ताच्या शनिवार आणि रविवार पुरवण्यांची जबाबदारी पार पाडली. याशिवाय त्या मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणी सदस्या असून जुलै, २०१३मध्ये जिनीव्हा येथे जाऊन त्यांनी ‘युनायटेड नेशन्स’मध्ये ग्राहक हक्कांच्या गाइडलाइनमधील सुधारणांवर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी दोन फेलोशिप्सअंतर्गत ‘मुंबईतील बारमध्ये काम करणाऱ्या मुलींचे प्रश्न’ आणि ‘महिलांचे प्रजनन स्वास्थ्य’ या विषयांवर संशोधनही केलं आहे.