चरित्र
चरित्र
सुधा कुलकर्णी-मूर्ती (जन्म : १९ ऑगस्ट १९५०, शिगगाव, कर्नाटक) या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत. इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून त्यांनी संगणकशास्त्रात एम.ई. केले. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंता होत्या; टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्या काम करतात. त्या मराठी, कन्नड आणि इंग्रजीत लेखन करतात; त्यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या आणि अनेक कथासंग्रह लिहिले आहेत. 'डॉलर बहू' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. २००६ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरवले.