चरित्र
चरित्र
सुधीर मोघे (८ फेब्रुवारी १९३९, किर्लोस्करवाडी – १५ मार्च २०१४, पुणे) हे मराठी कवी, गीतकार आणि संगीतकार होते. काव्य आणि चित्रपटगीतलेखनाबरोबरच ललित लेखन, पटकथा-संवादलेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन आणि रंगमंचीय सादरीकरण अशा अनेक माध्यमांत त्यांनी काम केले. पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. ते उत्तम चित्रकारही होते आणि त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली होती. ज्येष्ठ नाट्य-अभिनेते श्रीकांत मोघे हे त्यांचे थोरले बंधू होत.
समुदायाने जोडले
बंद