सुधीर फडके

चरित्र

चरित्र

रामचंद्र विनायक फडके ऊर्फ सुधीर फडके (२५ जुलै १९१९ – २९ जुलै २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार आणि गायक होते; 'बाबूजी' या नावानेही ते ओळखले जातात. सुमारे ५० वर्षे त्यांनी मराठी चित्रपटसंगीतावर आपला ठसा उमटवला आणि मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत मानले जाते. मराठीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायली आणि संगीतबद्ध केली. ग. दि. माडगूळकर यांच्या 'गीतरामायणा'तील सर्व ५६ गाणी त्यांनी संगीतबद्ध केली. त्यांची भक्तिगीते, भावगीते आणि चित्रपटगीते आजही लोकप्रिय आहेत.

समुदायाने जोडले
बंद