चरित्र
चरित्र
सुहास शिरवळकर ऊर्फ सु. शि. (१५ नोव्हेंबर १९४८ – ११ जुलै २००३) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक होते. त्यांनी १९७४ मध्ये रहस्यकथालेखनास सुरुवात केली आणि १९७९ पर्यंत सुमारे २५० लहान-मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० पासून ते सामाजिक कादंबरी या प्रकाराकडे वळले. रहस्यकथा आणि सुमारे १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी लघुकथा आणि काही बालकथाही लिहिल्या. आपले साहित्य सवंग होऊ न देता लोकप्रिय लेखन करणारे लेखक म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या 'देवकी' या कथेवर मराठी चित्रपट झाला, तर 'दुनियादारी' आणि 'कोवळीक' या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिका झाल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित झाला.
समुदायाने जोडले
बंद