सुमित्रा भावे

चरित्र

चरित्र

सुमित्रा भावे (१२ जानेवारी १९४३ – १९ एप्रिल २०२१) या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखिका होत्या. त्यांचा जन्म आणि मृत्यू पुणे येथे झाला. फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांत एम.ए. केले; टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून ग्रामकल्याण विषयाची पदविकाही घेतली. कर्वे समाजसेवा संस्थेत त्यांनी दहा वर्षे अध्यापन केले. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. सुनील सुकथनकर यांच्यासह त्यांनी अनेक मराठी चित्रपटांवर काम केले. त्यांनी सुमारे १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाणी मालिका केल्या; या मालिकांचे लेखनही त्यांचेच होते. 'दोघी', 'वास्तुपुरुष' आणि 'कासव' हे त्यांचे चित्रपट आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले.

समुदायाने जोडले
बंद