चरित्र
चरित्र
सुरेश भट (मृत्यू : १४ मार्च २००३) हे मराठीतील सुप्रसिद्ध कवी होते. मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार त्यांनी रुजवला, म्हणून त्यांना 'गझल सम्राट' म्हटले जाते. त्यांचा जन्म अमरावती येथे झाला; त्यांचे वडील श्रीधर भट डॉक्टर होते. अडीच वर्षांचे असताना पोलिओमुळे त्यांचा उजवा पाय कायमचा अधू झाला. आईमुळे त्यांना लहानपणीच कविता आणि संगीताची आवड लागली; ते बासरी वाजवत आणि उत्तम गायकही होते. 'रूपगंधा' (१९६१), 'रंग माझा वेगळा' (१९७४), 'एल्गार' (१९८३) आणि 'झंझावात' (१९९४) हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत.
समुदायाने जोडले
बंद