श्याम मनोहर

इंग्रजी नाव
Shyam Manohar

चरित्र

चरित्र

श्याम मनोहर ऊर्फ श्याम मनोहर आफळे (जन्म : २७ फेब्रुवारी १९४१, तासगाव, सांगली जिल्हा) हे मराठी साहित्यिक आहेत. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते २००१ मध्ये निवृत्त झाले. 'काँपिटिशन' ही त्यांची पहिली कथा. मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवणारे, वेगळ्या धाटणीचे लेखन ही त्यांची ओळख असून त्यांनी 'कादंबरी' या वाङ्मयप्रकाराची परिभाषाच बदलली, असे म्हटले जाते. समाजातील विविध स्तरांतील व्यक्ती, त्यांचे परस्परसंबंध आणि त्यातील गुंतागुंत ते माणसांविषयीची आस्था न सोडता मांडतात. 'हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव' (१९८३), 'शीतयुद्ध सदानंद' (१९८७), 'कळ' (१९९६) आणि 'खूप लोक आहेत' (२००२) ही त्यांची पुस्तके आहेत. 'उत्सुकतेने मी झोपलो' या कादंबरीसाठी त्यांना २००८ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

समुदायाने जोडले
बंद