ताराबाई शिंदे

चरित्र

चरित्र

ताराबाई शिंदे (१८५० – १९१०) या महाराष्ट्रातील स्त्रीवादी लेखिका आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'स्त्री-पुरुष तुलना' या पुस्तकाच्या त्या लेखिका होत्या. त्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे जमीनदार आणि सत्यशोधक समाजाचे सभासद होते; त्यामुळे त्यांच्या घरात सुरुवातीपासून स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते. त्या मराठी, संस्कृत आणि इंग्रजी शिकल्या, त्यांना वाचनाची आवड होती आणि त्या घोडेस्वारीही शिकल्या. शेतीच्या आणि कोर्टाच्या कामांतही त्या लक्ष घालत. एका सर्वसामान्य माणसाशी त्यांचा विवाह झाला, पण त्यांचा संसार सुखाचा झाला नाही. एकोणिसाव्या शतकातील स्त्रियांच्या स्थितीवर परखड भाष्य करणारे त्यांचे लेखन मराठी स्त्रीवादी लेखनात महत्त्वाचे मानले जाते.

समुदायाने जोडले
बंद