चरित्र
चरित्र
त्र्यंबक शंकर शेजवलकर (२५ मे १८९५, कशेळी, रत्नागिरी – २८ नोव्हेंबर १९६३, मुंबई) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक आणि संपादक होते. शिवकाल आणि पेशवेकाल यांच्या इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले. 'निजाम-पेशवे संबंध', 'पानिपत : १७६१' आणि 'श्रीशिवछत्रपती' हे त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाबरोबरच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवनाविषयीचे त्यांचे समीक्षात्मक लेखन 'प्रगती' साप्ताहिकातून प्रसिद्ध झाले; त्या साप्ताहिकाचे ते संपादक होते.
समुदायाने जोडले
बंद