चरित्र
चरित्र
उद्धव ज. शेळके (८ ऑक्टोबर १९३० – ३ एप्रिल १९९२) हे अमरावती जिल्ह्यातील मराठी कादंबरीकार होते. १९५० च्या सुमारास त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली. 'शिळान' हा त्यांचा पहिला कथासंग्रह वैदर्भीय ग्रामीण जीवनाच्या सूक्ष्म चित्रणामुळे आणि बोलीच्या वापरामुळे लक्षणीय ठरला. ग्रामीण पार्श्वभूमीवरील 'धग' ही त्यांची कादंबरी विशेष गाजली; नागपूर आकाशवाणीवरून तिचे क्रमशः वाचन झाले. वारांगनांच्या जीवनावरील 'डाळिंबाचे दाणे' ही कादंबरीही प्रसिद्ध आहे. 'धुंदी', 'पुरुष', 'नांदतं घर', 'कोवळीक', 'गोल्डन व्हिला', 'महामार्ग' अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. वऱ्हाडी बोलीतून जनसामान्यांचे जीवन मांडणारे श्रेष्ठ वैदर्भीय कादंबरीकार म्हणून ते ओळखले जातात.
समुदायाने जोडले
बंद