चरित्र
चरित्र
उमाकांत निमराज ठोमरे (१५ ऑगस्ट १९२९ – ७ ऑक्टोबर १९९९) हे मराठी लेखक, संपादक आणि बालसाहित्यकार होते. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला; प्राथमिक शिक्षण तिथेच तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. ते मुंबईत स्थायिक झाले आणि 'वीणा' या दर्जेदार मराठी मासिकाचे संपादक होते. व्यंग्यचित्र या प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्यात 'वीणा'चा मोठा वाटा मानला जातो. 'वगैरे...वगैरे' हा त्यांचा लेखसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे. 'चकवा' (कथासंग्रह), 'ठुमरी' (व्यक्तिचित्रे), 'सिंहाचा मुखवटा' (कादंबरी), 'कळसूत्र' (एकांकिका), तसेच 'जादूचा मासा', 'जादूचा पावा' यांसारखी अनेक बालपुस्तके आणि 'निसर्ग', 'चक्रावर्त' इत्यादी अनुवाद त्यांच्या नावावर आहेत.
समुदायाने जोडले
बंद