उर्मिला पवार

चरित्र

चरित्र

ऊर्मिला पवार (जन्म : ७ मे १९४५) या मराठी लेखिका आहेत; त्यांचे मूळ गाव तळकोकणात आहे. शिक्षक असलेले वडील लहानपणीच वारल्याने त्यांच्या आईला आयदान (बांबूच्या टोपल्या) विणून चरितार्थ चालवावा लागला. एम.ए.चे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि १९८८ मध्ये 'सहावं बोट' हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या 'आयदान' या आत्मकथनाने मराठी आत्मकथेला ऐतिहासिक वळण दिले; दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं ते आयदान' अशी केली जाते. त्यांच्या कथा आणि आत्मकथनाचे इंग्रजी, स्वीडिश आदी भाषांत अनुवाद झाले आहेत.

समुदायाने जोडले
बंद