उत्तम कांबळे

इंग्रजी नाव
Uttam Kamble

चरित्र

चरित्र

उत्तम कांबळे हे मराठी संपादक, पत्रकार आणि साहित्यिक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी येथे शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत कंपाउंडर, वृत्तपत्रविक्रेता, हमाली अशी कामे करत त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली. १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक 'समाज'मधून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली आणि १९८२ मध्ये 'सकाळ'मध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले; मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक होते. 'आई समजून घेताना' या आत्मकथनपर पुस्तकाचे कन्नड आणि इंग्रजीत अनुवाद झाले. 'अस्वस्थ नायक', 'श्राद्ध', 'मिरवणूक' या कादंबऱ्या आणि 'कावळे आणि माणसं', 'न दिसणारी लढाई' हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. ठाणे येथे झालेल्या ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

समुदायाने जोडले
बंद