वामन अच्युत देशपांडे

चरित्र

चरित्र

वामन अच्युत देशपांडे (३१ ऑगस्ट १९४४, मुंबई – १० जून २०२५, डोंबिवली) हे संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक होते. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा आणि भागवत यांवर त्यांनी विपुल लेखन केले आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रवचने दिली. त्यांची १२५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून संत साहित्याबरोबरच कविता, कथा, कादंबरी आणि समीक्षा या प्रकारांतही त्यांनी लेखन केले. रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाल्यानंतर ते पूर्णवेळ लेखनाकडे वळले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे ते काही काळ अध्यक्ष होते. दैनिक 'सामना'मध्ये त्यांनी अनेक वर्षे संत वाङ्मयावर सदर लिहिले. मुलांना संतांचा परिचय करून देणाऱ्या लेखमालाही त्यांनी लिहिल्या. त्यांची पंधरा गीते रामदास कामत यांनी गायली आहेत.

समुदायाने जोडले
बंद