चरित्र
चरित्र
वासुदेव सीताराम बेंद्रे (१३ फेब्रुवारी १८९४ – १६ जुलै १९८४) हे मराठी इतिहाससंशोधक आणि इतिहासकार होते. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना लहान वयातच नोकरी करावी लागली; १९१३ मध्ये लघुलेखनाच्या आंतरराष्ट्रीय परीक्षेत ते सुवर्णपदकासह पहिले आले. १९१८ पासून ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले आणि वि. का. राजवाडे यांना गुरुस्थानी मानून त्यांनी संशोधन केले. सतराव्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास हे त्यांचे प्रमुख संशोधनक्षेत्र होते. १९२८ मध्ये प्रसिद्ध झालेला 'साधन चिकित्सा' हा त्यांचा पहिला ग्रंथ नवीन संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरला.
समुदायाने जोडले
बंद