वि. वा. शिरवाडकर

टोपणनाव:

टोपणनाव
कुसुमाग्रज

इंग्रजी नाव
V. V. Shirwadkar (Kusumagraj)

चरित्र

चरित्र

विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठीतील अग्रगण्य कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक होते; 'कुसुमाग्रज' या टोपणनावाने त्यांनी कविता लिहिल्या. वि. स. खांडेकरांनंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरील प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये मानली जातात. पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांतील मानवी वृत्तीचा शोध त्यांच्या लेखनात दिसतो. त्यांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.

समुदायाने जोडले
बंद