छायाचित्र
विजय पाडळकर

विजय पाडळकर

चरित्र

चरित्र

विजय वसंतराव पाडळकर (जन्म : ४ ऑक्टोबर १९४८) हे मराठी समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार आहेत. अभिजात साहित्य आणि चित्रपट हे त्यांच्या अभ्यासाचे मुख्य विषय आहेत. त्यांचा जन्म बीड येथे झाला. वडील उप-शिक्षणाधिकारी असल्याने त्यांचे शिक्षण देगलूर, कंधार, औरंगाबाद अशा ठिकाणी झाले. १९७२ मध्ये नांदेडच्या पीपल्स कॉलेजमधून ते एम.कॉम. झाले. १९७० मध्ये ते महाराष्ट्र बँकेत रुजू झाले आणि २००१ मध्ये लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. १९८४ मध्ये 'मराठवाडा' दैनिकात 'अक्षर संगत' हे सदर लिहून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. गुलजार यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा आढावा घेणारे 'गंगा आए कहाँ से' हे त्यांचे पुस्तक आहे. त्यांची ३५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना पाच राज्य पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

समुदायाने जोडले
बंद