चरित्र
चरित्र
डॉ. विजया राजाध्यक्ष (जन्म : ५ ऑगस्ट १९३३) या मराठी स्त्रीवादी लेखिका आणि समीक्षक आहेत. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले. समीक्षक मं. वि. राजाध्यक्ष हे त्यांचे पती. 'अधांतर' हा त्यांचा पहिला संग्रह; त्यानंतर 'विदेही', 'अनोळखी', 'अकल्पित', 'हुंकार', 'उत्तरार्ध' असे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय स्त्रीजीवन आणि कौटुंबिक नात्यांचा वेध घेतात. 'कवितारती', 'जिव्हार', 'संवाद' ही त्यांची समीक्षात्मक पुस्तके प्रसिद्ध आहेत. 'मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ' या ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
समुदायाने जोडले
बंद