चरित्र
चरित्र
विलास गोविंद सारंग (१९४२ – १४ एप्रिल २०१५) हे नवतेचा आग्रह धरणारे मराठी लेखक होते. त्यांचा जन्म कारवार येथे झाला आणि मृत्यू मुंबईत झाला. त्यांचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. १९६० पासून ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत लिहीत; काही लेखन आधी मराठीत करून नंतर इंग्रजीत, तर काही उलट पद्धतीने त्यांनी केले. त्यांची मराठीत अकरा आणि इंग्रजीत आठ पुस्तके आहेत. त्यांची तुलना काफ्काशी होत असे आणि त्यांना 'मराठीतले काफ्का' असेही म्हटले जाई. ते आधुनिक परंपरेतील कवी, कथाकार आणि कादंबरीकार होते; त्यांचे समीक्षालेखन साहित्यसंस्कृतीवरील भाष्य मानले जाते. 'एन्कीच्या राज्यात' ही कादंबरी आणि 'सोलेदाद' ही त्यांची पुस्तके आहेत.
समुदायाने जोडले
बंद