चरित्र
चरित्र
वीणा गवाणकर (जन्म : ६ मे १९४३) या मराठी लेखिका आहेत. नावाजलेल्या व्यक्तींचे चरित्रलेखन हा त्यांचा मुख्य विषय आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जीवनावरील 'एक होता कार्व्हर' हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. 'डॉ. आयडा स्कडर', 'गोल्डा - एक अशांत वादळ', 'डॉ. खानखोजे - नाही चिरा...', 'सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स', 'लीझ माइट्नर', 'डॉ. सलीम अली' आणि 'किमयागार कार्व्हर' ही त्यांची इतर चरित्रे आहेत; 'रोझलिंड फ्रँकलिन' आणि 'इंटिमेट डेथ' हे त्यांचे अनुवाद आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा मराठी वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार तीन वेळा मिळाला. कोकण मराठी साहित्य परिषदेचा धनंजय कीर पुरस्कार, घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार आणि २०१५ चा नवशक्ती जीवनगौरव पुरस्कार हे सन्मानही त्यांना मिळाले.
समुदायाने जोडले
बंद