चरित्र
चरित्र
विनायक नरहर भावे ऊर्फ विनोबा भावे (११ सप्टेंबर १८९५ – १५ नोव्हेंबर १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, सर्वोदयी नेते आणि भूदान चळवळीचे प्रणेते होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे येथे झाला. त्यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथे झाले. १९१६ मध्ये ते वाराणसीला गेले; तेथे महात्मा गांधींच्या भाषणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. १९४० मध्ये गांधीजींनी 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला तेव्हा पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. १९५१ ते १९७३ या काळात त्यांनी भूदानयात्रा केली; इतर काळ ते वर्ध्याच्या आश्रमात राहिले. 'गीता प्रवचने' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध असून भूदानयज्ञाचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग झाला.
समुदायाने जोडले
बंद