विंदा करंदीकर

चरित्र

चरित्र

गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर (२३ ऑगस्ट १९१८ – १४ मार्च २०१०) हे मराठी कवी, लेखक, अनुवादक आणि समीक्षक होते. त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले. हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेऊन त्यांनी तुरुंगवास भोगला. १९४९ मध्ये पुण्यातील साहित्य संमेलनातील जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी वाचकांना परिचय झाला. 'अष्टदर्शने' या कृतीसाठी त्यांना ३९वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला; वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. 'स्पर्शाची पालवी', 'आकाशाचा अर्थ' हे ललित निबंधसंग्रह, 'परंपरा आणि नवता' हा समीक्षाग्रंथ आणि ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, 'फाउस्ट', 'राजा लिअर' हे अनुवाद त्यांच्या नावावर आहेत. महाराष्ट्र सरकार त्यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देते.

समुदायाने जोडले
बंद