चरित्र
चरित्र
विठ्ठल सीताराम गुर्जर ऊर्फ वि. सी. गुर्जर (१८ मे १८८५, कशेळी – १९ सप्टेंबर १९६२, कशेळी) हे मराठी लघुकथालेखक होते. मराठी लघुकथालेखनात त्यांनी स्वतंत्र कालखंड सुरू केला, असे मानले जाते. मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले, परंतु आजारपणामुळे त्यांना बी.ए. पूर्ण करता आले नाही. तरीही त्यांचा 'द्राक्षांचे घोस' हा कथासंग्रह एम.ए.च्या अभ्यासक्रमात नेमला गेला होता. १९१० नंतरच्या काळात मराठी कथा लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने त्यांच्याकडे जाते.
समुदायाने जोडले
बंद