चरित्र
चरित्र
विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर (२० मे १८५०, पुणे – १७ मार्च १८८२) हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेही नामवंत लेखक होते. पुण्यातील पूना कॉलेज आणि डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन १८७१ मध्ये त्यांनी पदवी मिळवली; इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि इंग्रजी-संस्कृत-मराठी ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वडिलांच्या 'शालापत्रक' मासिकाचे काम ते पाहत; ब्रिटिश धोरणांवरील टीकेमुळे ते मासिक १८७५ मध्ये बंद पाडण्यात आले. त्यांनी एकहाती लिहिलेले 'निबंधमाला' हे मासिक मराठी गद्याच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते.
समुदायाने जोडले
बंद