चरित्र
चरित्र
विश्राम बेडेकर ऊर्फ विश्वनाथ चिंतामणी बेडेकर (१३ ऑगस्ट १९०६ – ३० ऑक्टोबर १९९८) हे मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म अमरावती येथे झाला. लेखिका मालती बेडेकर या त्यांच्या पत्नी. मास्टर दीनानाथांच्या नाटक मंडळीसाठी त्यांनी 'ब्रह्मकुमारी' (१९३३) हे नाटक लिहिले. १९३४ मध्ये 'कृष्णार्जुन युद्ध' या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून ते चित्रपटसृष्टीत आले आणि १९३५ मध्ये वा. ना. भट यांच्यासह 'भट-बेडेकर प्रॉडक्शन्स' स्थापन केली. गडकऱ्यांच्या 'ठकीचे लग्न' आणि चिं. वि. जोशींच्या 'सत्याचे प्रयोग' या कथांवरील त्यांचे चित्रपट हे मराठीतील पहिले विनोदी चित्रपट होते. 'एक झाड आणि दोन पक्षी' या पुस्तकाला १९८५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८८ मध्ये मुंबईतील मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
समुदायाने जोडले
बंद