चरित्र
चरित्र
विश्वास पाटील (जन्म : २८ नोव्हेंबर १९५९) हे मराठी लेखक आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांची 'झाडाझडती' ही कादंबरी १९९२ च्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवली गेली. 'पानिपत' या कादंबरीला प्रियदर्शनी पुरस्कार मिळाला. 'चंद्रमुखी', 'पांगिरा' आणि 'महानायक' या त्यांच्या कादंबऱ्यांची हिंदी भाषांतरे झाली आहेत. 'नाग केसर' (२०१९) हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. गोव्याचा नाथमाधव पुरस्कार आणि कलकत्त्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारासह त्यांना पस्तीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
समुदायाने जोडले
बंद