वसंत आबाजी डहाके

चरित्र

चरित्र

वसंत आबाजी डहाके (जन्म : ३० मार्च १९४२) हे मराठी कवी, लेखक, भाषातज्ज्ञ आणि कोशकार आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे झाला; प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे आणि पाचवी ते बी.ए.पर्यंतचे शिक्षण चंद्रपूर येथे झाले. १९६६ मध्ये 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. 'योगभ्रष्ट' (१९७२), 'शुभवर्तमान' (१९८७), 'शुनःशेप' (१९९६) आणि 'चित्रलिपी' हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. 'अधोलोक' आणि 'प्रतिबद्ध आणि मर्त्य' या कादंबऱ्या, 'मालटेकडीवरून' हा ललित लेखसंग्रह, तसेच 'मराठीतील कथनरूपे' आणि 'मराठी नाटक आणि रंगभूमी - विसावे शतक' ही वैचारिक पुस्तके त्यांनी लिहिली. 'चित्रलिपी'साठी त्यांना २००९ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. फेब्रुवारी २०१२ मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या ८५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

समुदायाने जोडले
बंद