चरित्र
चरित्र
विश्वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट (२५ जुलै १९२२ – १७ सप्टेंबर २००२) हे मराठी कवी होते. त्यांचा जन्म कऱ्हाड येथे झाला आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स. प. महाविद्यालयात झाले. १९४२ च्या चलेजाव चळवळीत सहभागी झाल्यामुळे ऑगस्ट १९४३ ते जानेवारी १९४५ या काळात ते तुरुंगात होते. नंतर ते मुंबईतील नॅशनल कॉलेज आणि रुईया कॉलेजमध्ये मराठी व संस्कृतचे प्राध्यापक झाले; १९७४ मध्ये मुंबई विद्यापीठातील रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे प्राध्यापक झाले. राष्ट्र सेवा दल आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार त्यांच्यावर होते. 'बिजली' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह; त्यानंतर 'सेतू', 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे संग्रह आले. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
समुदायाने जोडले
बंद