व्यंकटेश माडगूळकर

इंग्रजी नाव
Vyankatesha Madgulkar

चरित्र

चरित्र

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (५ एप्रिल १९२७ – २७ ऑगस्ट २००१) हे मराठी लेखक, चित्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ येथे झाला. कवी ग. दि. माडगूळकर हे त्यांचे थोरले बंधू. औपचारिक शिक्षण फारसे न होताही त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. १९५५ ते १९८५ या काळात ते आकाशवाणीत नोकरीला होते आणि त्यांनी चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. 'माणदेशी माणसे' (१९४९) या कथासंग्रहापासून वास्तववादी ग्रामीण साहित्याचा आरंभ झाला असे मानले जाते. 'बनगरवाडी', 'वावटळ', 'कोवळे दिवस', 'करुणाष्टक' आणि 'सत्तांतर' या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. 'सत्तांतर'साठी त्यांना १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या कथांचे जर्मन, जपानी, रशियन आदी भाषांत अनुवाद झाले.

समुदायाने जोडले
बंद